जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात भर सायंकाळच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी सांधत घरफोडी केली आहे. यात तब्बल ४ लाख ३० हजाराचे सोन्यासह रोकड लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील विजय कॉलनी परिसरातील प्रसाद अपार्टमेंट येथील घर न.१० मधील रहिवासी गणेश नारायण व्यास(वय ४९) हे दि ६ रोजी घरी कुणीही नसताना चोरट्यांनी हीच संधीचा फायदा घेत घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान चोरून नेले. यातील १ लाख ८० हजाराची रोकड तर २ लाख २५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ३० हजार रुपये लंपास केले आहे. या प्रकरणी गणेश नारायण व्यास यांनी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय शांताराम देशमुख हे करीत आहेत.