जळगाव : प्रतिनिधी
शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन विवाहिता पतीला काही न सांगता, घरून निघून गेल्याच्या घटना १ एप्रिल व ३ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, पहिल्या घटनेत शहरातील इच्छादेवी चौक परिसरात आपल्या पती सोबत राहणारी ३८ वर्षीय विवाहिता १ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरात काही न सांगता रफूचक्कर झाली. याबाबत पतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार नितीन पाटील हे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील ३० वर्षीय विवाहिता देखील पती किंवा घरातील इतर कोणालाही न सांगता ३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घरातून गायब झाली. तालुका पोलिस स्टेशनमध्ये मीसिंगची नोंद करण्यात आली आहे.