Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातील तरुणाने जळगावात उचलले टोकाचे पाऊल !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यातील तरुणाने जळगावात उचलले टोकाचे पाऊल !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 6, 2023Updated:April 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील फुलपाट टाकळी या गावातील एका ३० वर्षीय तरुणाने आज दि ६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास शहरातुन धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या गिरणानदीच्या पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

    मिळाली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील फुलपाट टाकळी गावातील रहिवासी असलेल्या श्याम भिल (वय ३०) हा तरुण आज दि ६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास बांभोरी नजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेतली. यावेळी हि घटना घडत असताना रस्त्यावरील काही लोकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण त्याने अखेर पुलावरून थेट उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली. दरम्यान गावातील नागरिकांनी ओळख पटविली असून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. श्याम प्रताप भिल (वय-३०) रा. फुलपाट टाकळी तालुका धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    तात्काळ घटनास्थळी जळगाव तालुका पोलिस दाखल झाले होते. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ अनिल फेंगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.