धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मोठ्या जोमात कामाला लागली आहे. तर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत दोनगाव गाव येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे आजही जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जलवा कायम मानला जात आहे.
विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांचा नेतृत्वात व पालकमंत्री ना.श्री गुलाबरावजी पाटील यांचा आशीर्वादाणे दोनगाव बु!! ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला या वेळी ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदाचे पदभार स्वीकारलेले प्र.सरपंच सौ,वनिता सुरेश पवार, सौ चंदनबाई सुरेश पाटील. सौ. मनीषा भाऊलाल पाटील. सौ शुभांगी संदीप पाटील.सौ.अश्विनी गणेश पाटील. युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील, सुरेश पवार, सुरेश देवराम पाटील , किशोर राघो पाटील, जितेंद्र पाटील,पाळधी चे उदय झंवर, आबा माळी, अरुण पाटील, प्रशांत झंवर,हेमंत नारखेडे ,संदीप आसाराम पाटील उपस्थित होते.