पुणे : वृत्तसंस्था
अनैतिक सबंधातून महिलेसह तिच्या दोन लहानग्यां मुलांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील या तिहेरी हत्याकांडात दिरानेच वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने चारित्र्यावर संशय घेत अगोदर गळा दाबून जीव घेतला आणि नंतर पेटवून दिल्याची माहीती पोलिसांनी दिले आहेत.
वैभव वाघमारे असे खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर अम्रपाली वाघमारे असे मयत महिलेचे नाव आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीला आणि पाच वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.