धरणगाव (प्रतिनिधी)। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याचे समजते. याबाबत विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील कमल जिनिंगमध्ये आज मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गोपनिय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली. आज गुरूवारी ७ ऑक्टोबर रोजी एका पथकाने शहरातील कमल जिनिंगमध्ये अचानक छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोते आढळून आले आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचा आहे का की, खाजगी ? याची माहिती मिळविण्यासाठी सॅम्पल लॅबला पाठवण्यात येणार असल्याचेही कळते. दरम्यान, धरणगावात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा सापडल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.