Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिक्षाची वाट पाहत असलेल्या वृद्धाला भरधाव कारची धडक !
    क्राईम

    रिक्षाची वाट पाहत असलेल्या वृद्धाला भरधाव कारची धडक !

    editor deskBy editor deskApril 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील अजिंठा चौफुली जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या कारने कंपनीतून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या राजकुमार सोमोमल धामेचा (वय-65) रा. सम्राट कॉलनी यांना जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून कारचालक पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सम्राट कॉलनीत राजकुमार धामेचा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गेल्या 10 वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते रात्री घरी येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील नेस्ट शोरूमजवळ ते रिक्षाची वाट पाहत उभे होते.
    त्यावेळी मागून अज्ञात कारने भरधाव वेगाने येवून त्यांच्या मागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 5 विवाहित मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण आणि सिध्देश्वर डापकर करीत आहे. भरधाव कारने वृद्धाला धडक दिल्यानंतर तो घटनास्थळाहून पसार झाला. पोलिसांनी कारचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो मिळून आला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.