Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४० आमदारासह मुख्यमंत्री शिंदे या दिवशी जाणार अयोध्या दौऱ्याला
    राजकारण

    ४० आमदारासह मुख्यमंत्री शिंदे या दिवशी जाणार अयोध्या दौऱ्याला

    editor deskBy editor deskApril 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :  वृत्तसंस्था 

    राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्याबाबत अनेक चर्चा होवू लागल्या होत्या पण अद्याप तारीख जाहीर न झाल्याने आमदारासह कार्यकर्ते गोंधळात होते पण आता हा दौरा निश्चित झाला असून येत्या ९ रोजी मुख्यमंत्री शिंदेसह ४० आमदार अयोध्यात दाखल होणार आहे.

    या दौऱ्याचा टीझर आता जारी करण्यात आला आहे. ‘अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ’, अशी टॅगलाईन असलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र एक सुशासित राज्य आहे, असा दावा करण्यात आला आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात सामान्य जनता हा एक परिवार आहे तर जनतेची सेवा, मानव सेवा हेच परम कर्तव्य आहे, अशी एकनाथ शिंदेंची ओळख ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंदूत्व ठसवण्याचाही जोरदार प्रयत्न या टीझरमधून करण्यात आला आहे. ‘भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, रग रग में राम, कण कण में राम’, अशा प्रकारे ओळी वापरण्यात आले आहेत. संपूर्ण हिंदी भाषेत हा टीझर आहे आणि सर्वात शेवटी ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’, असा शंखनाद करण्यात आला आहे. एकूणच शिंदेंचे हिंदुत्व ठसवण्याचा प्रयत्न टीझरमधून करण्यात आला आहे.

    एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. शिवसेनेत फूट होण्यापूर्वी ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर शिवसेनेत झालेली उभ फूट अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. शिंदे यांचा हा अयोध्या दौरा एका सूनियोजित राजकीय रणनीतींतर्गत होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या या नियोजित दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवेसनेच्या सर्व आमदारांसह त्यांचे खासदार सुपूत्र श्रीकांत शिंदे असतील असा अंदाज आहे. गत महिन्याभरापासून शिंदे यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.