अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गांधली येथील एका २८ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र बसमध्ये बसत असतांना अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील गांधली येथील रहिवासी शुभांगिनी पाटील (वय २८) या दि ४ एप्रिल रोजी साय.५ वाजेच्या सुमारास अमळनेर येथून आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानक परिसरात असलेल्या बसमध्ये गर्दीमधून चढत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तत्काळ अमळनेर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.विलास पाटील हे करीत आहेत.