प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील जळके व वसंतवाडी परिसरात विजेची चोरी करणाऱ्यांवर महावितरण विभागाने धडक कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथे आज दुपारी ३वाजेच्या सुमारास जळके विद्युत उपकेंद्राचे ज्यु.अभियंता मानसी माने यांनी महावितरण कंपनीचे कर्मचारी लाईनमन लोकमान तडवी, शिवाजी काळे, संतोष पाटील, दिनेश पाटील व संतोष सरदार या पथकाने धाडसत्र राबविले. या कारवाईत विधी सत्वरी करणाऱ्या दहा जणांना पकडले. जळके, वसंतवाडी येथे दोन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले ते म्हणजे कार्यवाही होणार का? परंतु अचानक झालेल्या कार्यवाही मुळे चर्चाही रंगली कि असे काय घडले कि या परिसरात स्वतः अभियंत्यांना लक्ष द्यावे लागले आतापर्यंत कोणाच्या आशिर्वादाने विजचोरी होत होती या ठिकाणी पकडलेल्या विजचोरी धारकांनवर कार्यवाही होणार की राजकीय हस्तक्षेप होऊन प्रकरण मिटवले जाणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.