Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : लग्न मंडपातून नवरदेवाची निघाली अंत्ययात्रा !
    क्राईम

    धक्कादायक : लग्न मंडपातून नवरदेवाची निघाली अंत्ययात्रा !

    editor deskBy editor deskApril 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भंडारा : वृत्तसंस्था 

    जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तरुण डॉक्टरने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुणाल भाऊराव चव्हाण (35) रा. स्नेहनगर तकिया वॉर्ड असं या डॉक्टरचं नावं आहे. कुणाला चव्हाण हे नागपूरच्या मेयो रूग्णालयात कर्तव्यावर होते. कुणाल यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

    विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी कुणाल यांचं लग्न होतं. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल चव्हाण हे नागपूरच्या मेयो रुग्णालयात कार्यरत होते. आपल्या मुलाला मोठ्या कष्टानं आई-वडिलांनी डॉक्टर बनवलं, मुलगा डॉक्टर झाल्यावर त्याच्या सुखी संसारचं स्वप्न त्यांनी पाहिलं.

    त्यांनी आपल्या मुलाचं लग्न देखील ठरवलं. मात्र लग्न एका दिवसावर आलं असताना कुणाल चव्हाण यांनी आत्महत्या केली. कुणाला यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. कुटुंबावर शोककळा कुणाल यांचं लग्न एका दिवसावर आलं होतं. घरात सर्वत्र लग्नाचा आनंद होता. उत्साही वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी मुलाचं लग्न असल्यानं आई-वडिलही खुशीत होते. सर्व सुरळीत सुरू असताना त्यांनी अचानक टोकाचं पाऊल उचल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.