Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी मंत्री अडचणीत ; पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी !
    क्राईम

    माजी मंत्री अडचणीत ; पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी !

    editor deskBy editor deskApril 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच​​​​​​ पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलिस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे.

    ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणांच्या जागेवर जाण्यास इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांच्याशी संबंधित वेगवेगळे व्यवसायिक यांच्याशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याची कोणती कागदपत्रे आहेत त्याबाबत कोणते पुरावे मिळू शकतात का ? याबाबतची तपासणी ईडीच्या पथकामार्फत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी मोठ्या प्रमाणात छापेमारी होत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या इडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. मुश्रीफ यांनी कोट्यवधींची लूट केली असून भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

    #ed. #ncp
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.