Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
    क्राईम

    जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

    editor deskBy editor deskApril 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील टॉवर चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला झाल्याची घटना रात्री घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, छत्रपती संभाजी नगर येथील विक्की सांडू यादव (वय 28, रा. मूळ छत्रपती संभाजी नगर, ह.मु. जळगाव) तरुण जळगाव शहरात कामासाठी आलेला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास विकी हा संशयितासोबत टॉवर चौकात आला होता. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका हॉटेल जवळ ते उभे असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संशयतांनी विकी यादव वर चॉपर ने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या यामध्ये तरुणाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

    शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच तरुणावर चॉपर हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तरुणावर चॉपर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन ते तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.