Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मित्रांच्या आग्रहास्तव जेवणाला आला अन् परतताना जिवानिशी गेला !
    क्राईम

    मित्रांच्या आग्रहास्तव जेवणाला आला अन् परतताना जिवानिशी गेला !

    editor deskBy editor deskApril 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर फायनान्स कंपनीतील आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु. कोल्हेनगर, जळगाव) या। तरूणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत असणाऱ्या १०-१२ मित्रांच्या ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल मध्ये जेवणाला जाण्याचे ठरवले होते. अक्षय याने सुरुवातीला नकार दिला होता. परंतू नंतर एका मित्राच्या आग्रहाखातर तो जेवणाला सर्वात उशिरा पोहोचला. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर त्याने सेल्फी काढले. त्यानंतर हॉटेलमधून आपली दुचाकी काढून घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या मित्राला सुध्दा जळगाव शहराकडे जायचे होते. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ तो देखील निघाला. पण, अक्षय हा महामार्गावर दुचाकी घेत असतांना अचनक बांभोरीकडून जळगावकडे जाणा-या भरधाव ट्रकने (एम. एच. ४९ ए.टी.४४०७) धडक दिली आणि अक्षय थेट कंटेनरच्या चाकाखाली आला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

    अपघात एवढा भयंकर होता की, मृतदेहाचा छातीवरील भागचा अक्षरश: चेंदामेंदा झालेला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआय गणेश सायकर, विश्वनाथ गायकवाड, प्रवीण पाटील, जयेंद्र पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. मयताच्या पश्चात पत्नी आणि एक चार वर्षाची मुलगी आहे. मयताच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले होते. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात विजय पिंजलकर यांच्या तक्रारीनंतर ट्रक चालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.