धरणगाव : प्रतिनिधी
राज्यात शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु असतांना राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात विकासकामाचे भूमिपूजन असो वा लोकार्पण असो असे अनेक कार्यक्रम सुरु आहे. तसेच कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विकासाची गंगा गावागावापर्यत पोहचविण्यात व्यस्त आहे. धरणगाव तालुक्यातील भोणे या गावी आज विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गावातील एका कुटुंबावर शोककळा पसरल्याने हा कार्यक्रम मंत्री पाटील यांनी रद्द केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामधील भोणे यागावातील जलजीवन मिशन अंतर्गत, अत्याधुनिक फर्निचर, व्यायाम शाळा, कॉक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, सभा मंडप, यासह विविध विकास कामाचे आज भूमिपूजन असतांना अचानक गावतील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे शिक्षक मधूकर पोपट फुलपगारे यांची पत्नी योगिता फुलपगारे यांचे दुखद निधन झाल्याने हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामाध्यमातून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धरणगाव तालुका म्हणजे गुलाबराव पाटील यांचा एक परिवार आहे अन परीवारातील जर सदस्य दुखात असतो त्यावेळेस आपण कोणताही आनंद साजरा करू शकत नाही तर त्याच्या दुखात सहभागी होवून १० दिवसाचे सुतक ठेवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी सहभागी होताना दिसत असतात अशी चर्चा देखील धरणगाव तालुक्यातील प्रत्येक चौका-चौकात ऐकायल मिळत आहे.
मतदार संघातील प्रत्येक घर हे माझे कुटुंब आहे. त्यांच्या सुखात दुखात मी नेहमी सहभागी असतो व आपल्या घरात जर दुख घटना झाल्यावर आपण भूमिपूजन करत बसणे मला योग्य वाटत नाही मला आधी माझ्या परिवारातील माणस महत्वाची आहे. ते भूमिपूजन नंतर होतच बसेल पण जो धक्का फुलपगारे परिवाराला लागला आहे. आज त्यांना माझ्या आधाराची गरज आहे. आणि मी त्यांच्यासोबत असणार आहे.
– ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा