मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान यासंबधी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा हटवली आहे. तर गृहमंत्री या तक्रारीवरून आमची चेष्टा करतात असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर राज्यात दंगली आणि दहशतवाद सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.