• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पावसासह उन्हाळ्यात जनतेला फुटणार घाम !

editor desk by editor desk
April 1, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
पावसासह उन्हाळ्यात जनतेला फुटणार घाम !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे अनेक भागातील शेतकरीचे नियोजन कोसळताना दिसून येत आहे. राज्यातील काही भागात पावसाचे संकेत तर काही भागात उन्हाचा चटका वाढणार असून कमाल तापमानात आणखी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तसेच, शुक्रवारी (31 मार्च) काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. आजदेखील विदर्भ तसेच, उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पारा चाळिशीपार गेला आहे. विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान 38 अंशांच्या पुढे आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून बहुतांश ठिकाणी पारा 15 ते 15 अंशांच्या दरम्यान आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ, ते तेलंगणापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर, तसेच उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भासह राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असतानाच शुक्रवारी (ता.31) दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह कांदा पिकाचे नुकसान होणार आहे. आंबा पिकालाही या पावसामुळे फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले असून आज विदर्भात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

Previous Post

पाचोऱ्याच्या बाजारातून अल्पवयीन मुलीस पळविले !

Next Post

खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी !

Next Post
खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी !

खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group