जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका तरुणाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ टाकत भावना दुखावल्या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा व्हिडीओ गुरुवारी मध्यरात्री काही तरुणांच्या व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर त्यांनी शनिवारी शहर पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी संदीप गावीत यांनीसुद्धा शहर पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.