जळगाव : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातून तरुणाची दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील वरडी येथील दगडू मयाराम कोळी (वय ३५) जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात दि २७ मार्च रोजी दुपारी आले असता. दुचाकी पार्क केलेली असतांना काही अनोळखी चोरट्यांनी या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.बी.४२८० हि सुमारे २० हजार रुपये किमतीची चोरून नेली आहे. या प्रकरणी त्यांनी तत्काळ जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.निलेश भावसार हे करीत आहेत.