Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १० वर्षाच्या मुलीने केली हिम्मत अन वाचला दरोडा !
    क्राईम

    १० वर्षाच्या मुलीने केली हिम्मत अन वाचला दरोडा !

    editor deskBy editor deskMarch 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील मुक्ताईनगर परिसरातील एसएमआयटी कॉलेजजवळ राहणाऱ्या वकिलाच्या घरी भरदुपारी काही संशयित आरोपींनी दरोडाच्या उद्देशाने येऊन वकिलाच्या १० वर्षाच्या मुलीवर दरवाजा उघडण्यासाठी दबाव टाकला. मात्र संशयित आरोपींना अजिबात न भिता या दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा न उघडून आरोपींना हिमतीने परतवून लावले. याबाबत बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, सचिन देविदास पाटील (वय-४३) यांनी याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची १० वर्षांची मुलगी शृंगी ही घरात एकटी होती. तेव्हा काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरासमोर आले. त्यातील एकाने वकिलांच्या दारासमोर जात दरवाजा वाजविला. तेव्हा सेफ्टी डोअर लावलेला असल्याने लहानग्या शृंगीने साधा दरवाजा उघडला. संशयित दरोडेखोर म्हणाला, मला पाणी पाज, नाहीतर मी दरवाजा तोडून आत घुसेल. मात्र शृंगीने हिम्मत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. अखेरपर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे दरोडेखोर तिथून निघून गेले. संध्याकाळी जेव्हा वकील सचिन पाटील घरात आले, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीने घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली. वकिलांच्या घरात संभाव्य दरोडा पडताना वाचला असला तरी गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा पोलीस दलामुळे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.