धरणगाव : प्रतिनिधी
पाळधी येथे मंगळवारी रात्री झालेल्या दोन गटातील दगडफेकी नंतर रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली होती त्या नुसार ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यातील १६ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांना एरंडोल आणि धरणगाव पोलीसात ठेवण्यात आले आहे. गावात दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.बुधवारी गाव पुर्णपणे बंद होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून तणाव पूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री वणी गडावर जाणारी दिंडी प्रार्थना स्थळावरून जात असताना काही लोकांनीं दिंडीवर दगडफेक केली. यामुळे पळापळ झाली. गावात घटना घडल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूने एकच गर्दी झाली. यावेळी दगडफेक करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत असताना एका गटाने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे तणाव वाढला तर दुसर्या गटाने दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून ते लंपास केले. यानंतर बंदोबस्त वाढल्यानंतर गर्दी कमी झाली. याचवेळी पोलिसांनी सी सी टी व्ही ची तपासणी करून संशयित निष्पन्न केले आणि धरपकड सुरू केली. यात दोन्ही बाजूंच्या 58 लोकांना अटक करण्यात आली आहे. गावातील तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे बुधवारी सकाळी पोलिसांनी केले त्या वेळी काही दुकानदारांनी आमचा काही एक संबंध नसताना आमचे नुकसान केल्याची भावना व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा, जळगांव, चाळीसगाव, अडावद, चोपडा आदि ठिकाणाहून तात्काळ पोलीस कुमक मागवण्यात आली तर एस आर पी चाही बंदोबस्त तैनात करण्यात आला. गावातील सर्व शाळा, दुकाने बंद ठेवली होती. शाळेतील परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. दिंडीवर झालेल्या दगडफेकीत गाडी क्र. एम एच 02 एक्स ए 4590चे नुकसान झाले आहे तर दिंडीतील रोहित कुमावत रा.शिर्डी, मिहिर बिढे रा.जळगांव हे जखमी झाल्याची फिर्याद राहुल संजय पाटील रा.जळगांव यांनी दिली आहे तर सरकार पक्षातर्फे विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वणी गडावर जाणारी दिंडी ची वेळी गैर कायद्याची मंडळी जमवून मोठ्या प्रमाणात विटा, दगड, काचेच्या बाटल्या दोन्ही गटाने जमविल्या तर शेख सलीम शेख गणी कुरेशी याने त्याचा ताब्यातील ट्रक पोलिसांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पो. काँ.जितेश नाईक हे जखमी झाले आहेत. तर पाळधीचे स. पो.नी.प्रमोद कठोरे, सुशीला सूर्यवंशी, अमृता निशिबकर, विजय चौधरी यांना ही दुखापत झाली आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,चोपडा भागाचे कृषीकेश रावले,पो. नि.उद्धव ढमाले, स. पो.नी. प्रमोद कठोरे, स.पो.नि.गणेश बुवा आदींनी भेट देवून शांतता प्रस्थापित केली. याप्रकरणी भा.दं. वि. 143, 147, 148, 149, 324, 427, 307, 353, 332, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम 3, 37 (1)(3)चे उल्लंघन आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधीचे स.पो.नी.प्रमोद कठोरे व त्यांचें सहकारी करीत आहेत. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचासत समिती सदस्याच्या वाहनाची सुध्दा तोडफोड केला. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला होता. काहींनी तर दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून चोरून नेले. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता होती.
पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयित निष्पन्न केले त्यानंतर मंगळवारी रात्रीसह दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्याकडून अटकसत्र राबविण्यात आले. आतापर्यंत दोन्ही गटातील सुमारे 58 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सकाळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे केले. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी दि. 29 मार्चच्या सकाळी 11 ते दि. 31 मार्चच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
संबधितांपैकी राहुल संजय पाटील (वय 28), विकी राजेंद्र बिढे (वय 22), मिहीर ऊर्फ मोहित प्रल्हाद बिढे (वय 22), दिपक राजेंद्र चौधरी (वय- 27), धिरज अरुण सुतार (वय- 21, दोन्ही रा. जोशी पेठ, जळगाव), पंकज राजेंद्र पाटील (वय 25 वर्षे, रा. तेली चौक जुने जळगाव), शेख दानिश शेख मुस्ताक (वय 22), सलीम युनुस पिंजारी (वय 30), जाफर शेख जब्बार )वय 25), शेख कय्युम शेख मेहमुद मन्यार (वय 38), शेख नदिन शेख गफ्फार (वय 27), शेख नजामोद्दीन शेख उस्मोद्दीन (वय 33), सुलतान खान आयुब खान (वय 28), जुबेर शेख हकिम (वय 30), अजरोद्दीन शेख अमिनोद्दीन (वय 26), साबीर सलीम मन्यार (वय 38), आदिल जब्बार शेख (वय 22), मोहीन शेख मुस्ताक (वय 22), शेखी रफिक शेख तौसीफ (वय 27), शेख रिजवान शेख रशिद (वय 26), आवेद खान असलम खान (वय 19), शेख शकिल शेक अजिज, (वय 35), महोम्मद वसिम मोहम्मद कलीम (वय 25), इद्रिस शेख शब्बीर (वय 24), ऐजाज अहमद शब्बीर, (वय 36) यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संशयितांकडून अॅड. राहुल पारेख, अॅड. आर.एस. पाटील, अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. असिफ कादरी, अॅड. इज्राहिल युसुफ, अॅड. शहा तर सरकारी वकील म्हणून अॅड. जिज्ञाली बडगुजर यांनी कामकाज पाहिले.