धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका हॉटेल परिसरातून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील वराड खु येथील विनोद गुलाब पिंजारी (वय ३६) हे आपल्या परिवारासह रहायला आहे. दि १२ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुसळी फाट्यावर असलेली हॉटेल अर्जुन या परिसरातून तरुणाची दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.डब्ल्यू.९४८६ हि २० हजार रुपये किमतीची अनोळखी इसमाने चोरून नेली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण निकुंभ हे करीत आहेत.