Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील दोन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !
    क्राईम

    जळगावातील दोन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !

    editor deskBy editor deskMarch 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, धार्मिक भावना दुखावणे, दरोड्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तांबापूरातील रिजावन उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-22) व रामेश्वर कॉलनीतील रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-21) या दोघ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढल्यानंतर त्यांची अमरावती व नागपुर कारागृहात रवागनी करण्यात आली आहे.

    जळगाव शहरासह धुळे जिल्हा, चोपडा तालुक्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला तसेच घरफोडी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशी हत्यार सोबत ठेवणे असे वेगवेगळेे 21 गंभीर गुन्हे रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख याच्यावर तर रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याच्यावर 16 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शहरात व जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन्ही गुन्हेगारांविरोधात स्थानबध्द करण्यासाठी अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी प्रस्ताव पडताळणी करून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दोघ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश त्यांनी काढले.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील सपोनि मोरे, युनूस शेख इब्राहीम, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, सफौ अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी यांच्या पथकाने रिजवान उर्फ काल्याला नागपूर कारागृहात तर रितेश उर्फ चिच्या शिंदे याची अमरावती कारागृहात रवानगी करणयात आल आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.