जळगाव : प्रतिनिधी
एका ७ वर्षाच्या मतीमंद अल्पवयीन मुलीस दि २८ रोजी घराच्या बाहेरून पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अशोक किराणा परिसरातील एका नगरात परिवारासह ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रहायला आहे. दि २८ रोजी हि अल्पवयीन मतीमंद मुलगी घराच्या अंगणात खेळत असतांना कुणी तरी इसमाने तिला काही तरी आमिष देत पळवून नेल्याची घटना काही वेळाने उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने थेट एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन हे करीत आहे.