Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदेवर राऊतांची जोरदार टीका !
    क्राईम

    मुख्यमंत्री शिंदेवर राऊतांची जोरदार टीका !

    editor deskBy editor deskMarch 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृतसंस्था 

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेद पदवी प्रदान केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी डॉक्टर झालेल्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळवतात येते. अशा पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांना डॉक्टरे देणाऱ्या विद्यापीठांचीच चौकशी व्हायला पाहीजे. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळवणारे लोक पायलीला पन्नास मिळतील.

    एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची अशी कोणती काम अडकली होती? अशा कोणत्या फायली अडकल्या होत्या त्यामुळे त्यांना असे काम करावे लागले. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आता डॉक्टर झाले आहेत. त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की वीर सावरकर कोणत्या बोटेतून उडी मारून कोणत्या बेटावर गेले? आम्हाला चांगला मुका मार देता येतो. आता तुम्ही डॉक्टर झाले आहात तर स्वत:वर ऑपरेशन करत रहा.

    भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे. विरोधकांच्या आंदोलनालाही भाजपकडून आडकाठी घातली जात आहे. या देशातील जनता आता भाजपविरोधात रस्त्यावर उतरत आहे. याचाच अर्थ जनतेच्या मनात भाजपविरोधात रोष आहे. या लोकांनी भाजपला मतदान केलेले नाही. भाजपने भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकलेली आहे. शरद पवारांनी ईव्हीएमचा मुद्दा पुढे आणला आहे. या विषयावर पुढे जाण्याची गरज आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.