Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीस्वारास मालवाहू गाडीने उडवले ; एक ठार !
    क्राईम

    दुचाकीस्वारास मालवाहू गाडीने उडवले ; एक ठार !

    editor deskBy editor deskMarch 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दोन मित्र वीटभट्टीवर दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील मनुदेवी माता मंदिरासमोर घडली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्वार सुरेश गणपत कुंभार (हिवरकर)(वय-40, रा. चौघुले प्लॉट) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार हे गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील चौघुले प्लॉट परिसरात सुरेश कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय असून त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची ममुराबाद रोडवर विट भट्टी असल्याने नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सुरेश कुंभार हे त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार यांच्यासोबत (एमएच 41 एच 9981) क्रमांकाच्या दुचाकीने ते भट्टीवर जाण्यासाठी निघाले.
    रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने जळगावकडे येणार्‍या (एमएच 19 सीवाय 8173) क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचा चक्काचून होवून सुरेश कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र दिलीप कुंभार हे गंभीर जखमी झाले. सुरेश कुंभार यांच्या पश्चात पत्नी मनिषा, दोन मुले निलेश आणि योगेश आणि मुलगी कोमल असा परिवार आहे. रस्त्यावर अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ जखमीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी सुरेश कुंभार यांची तपासणी करीत वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषीत केले. तर दिलीप कुंभार यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.