धरणगाव : प्रतिनिधी
आगामी बाजार समिती,जि.प.व पं स. तसेच विविध स्थानिक संस्थेचा निवडणुकीत जागेचा बरोबरीचा वाटाघाटी सहीत सन्मान पुर्वक वागणुक मिळाल्यास शिंदे गटाचा शिवसेनेशी युती करा अन्यथा स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी सज्ज व्हा..!अशी माहिती कार्यकर्ते चा मेळाव्यात देण्यात आली.
नुकताच येथील भाजपा चा तालुक्यातील मेळावा संपन्न झाला त्या प्रसंगी कार्यकर्ते तसेच नेत्याचा चर्चेत एक मुखी मागणी करण्यात आली साळवा फाटा जवळील साकरे गावा जवळ भारतीय जनता पार्टीचा मार्केट कमिटी निवडणूक संदर्भात व बुथ सशक्तीकरण कार्यकर्ता मेळावा संपन्न त्या प्रसंगी विविध स्थानिक संस्थेचा निवडणुका विषयी युती संदर्भात चर्चा करण्यात आली त्यात तालुक्यातील बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,शेतकरी आघाडी,ओबीसी आघाडी,युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारिंचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.त्या प्रसंगी मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,चंद्रशेखर दादा अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजयभाऊ महाजन,शिरिषआप्पा बयास,अँड. वसंतराव भोलाने बापू,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,एस आर पाटील ,एरंडोल चे माजी नगराध्यक्ष रविअण्णा महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन सह विविध मान्यवरांनी आपले विचार मांडुन सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
प्रारंभी तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व आगामी काळातील निवडणुकीचा संदर्भात चर्चा करण्यात आली. मेळाव्यात एरंडोल व धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य,मार्केट कमिटीचे माजी सदस्य,वि.का.सोसायटी सदस्य,शेतकी संघ सदस्य, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस कन्हैया रायपुरकर यांनी केले तर आभार विशाल पाटील यांनी मानले कार्यक्रमासाठी नगरसेवक ललित येवले यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते