अमळनेर : प्रतिनिधी
पिस्तूल दाखवून डांगर शिवारातील पेट्रोल पंपासह तिघांना लुटणाऱ्या आरोपीचा बुटावरून शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रईस शेख उस्मान (४०) आणि आरिफ अहमद शेख (३५, दोघे रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी कि, २४ रोजी मध्यरात्री शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर एकाने पिस्तूल दाखवत पंपावरील कर्मचारी व पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एक अशांकडून ३६ हजार रुपये लुटले होते. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या बुटावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. रईस शेख हा बंगाली फाइलमध्ये राहत होता. गल्लीत वाहनचालक असल्याचे त्याने सांगितले. न्या. स्वाती जोंधळे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील रवी पाटील, दीपक माळी, उपनिरीक्षक विकास शिरोळे व कॉ. योगेश महाजन यांनी ही कामगिरी बजावली.