Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात हॉटेलमध्ये चोरट्याचा धुमाकूळ !
    क्राईम

    जळगावात हॉटेलमध्ये चोरट्याचा धुमाकूळ !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 27, 2023Updated:March 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहरातील ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरातील हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत हॉटेलचे शटर वाकवून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी गल्ल्यातील १७ हजारांची रोकडसह सीपीयू चोरुन नेला. ही संपुर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शनिपेठेत चेतन अनिल वाणी यांच्या मालकीची ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरात मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता चेतन वाणी यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण करुन ते झोपून गेले. सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना हॉटेलच्या शटरचे एका बाजूने थोडे उचकवलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना काऊंटरमधील चिल्लर व चाव्या ह्या काऊंटरवर दिसल्या. त्यांनी लागलीच गल्ल्याची तपासणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यात ठेवलेली १७ हजारांची रोकड व हॉटेलमधील सीपीयू दिसून आला नाही. या घटनेनंतर चेतन वाणी यांनी तालुका पाोलीस ठाण्यात फोनद्वारे चोरी झाल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.