जळगाव : प्रतिनिधी
प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन आहे. आज विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते त्यांच्या वायफळ बडबडीपेक्षा प्रत्यक्ष आम्ही विकास कामांवर भर देत आहोत.सबका साथ ; सबका विकास या प्रमाणे सर्व समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न आहे. भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी 75 कोटींची तरतूद करण्यात आल्यामुल्ले सदर योजनेला चालना मिळाली आहे. त्यामुळे भागापुर वावडदा व परिसरात सिंचन क्षेत्र वाढणार आहे. कोणतेही निवडणूक किंवा प्रचार नसतांना सभांना येणारी गर्दी ही विकास कामांची पावती आहे. वावडंदा व तांड्या- वस्ती च्या जनतेचा सत्काराने मला अधिक कामे करण्याची उर्जा मिळेल असे भावनिक उदगार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते वावडदा येथिल बाजारपेठ चौकात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते रवी कापडणे व सेनेच्या कार्यकर्त्यांनी यांनी केले होते.
६ गावांमध्ये विकास कामांचा झंझावात
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातही गाव तेथे विकास कामे या प्रमाणे विविध विकास कामांचा झंझावात सुरु च ठेवलेला आहे. काळ झालेल्या कार्यक्रमात रामदेववाडी , जळके, सुभाषवाडी , वसंतवाडी, लोणवाडी, वडली, आणि वावडदा येथे पाणीपुरवठा योजना, ग्रामीण रस्ते डांबरीकरण, गाव अंतर्गत काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंगणवाडी ,व व्यायामशाळा बांधकाम, स्मशानभूमी सुशोभिकरण, सामाजिक सभागृह बांधकाम, , मुस्लीम समाज कब्रस्थान बाधकाम अश्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन दुध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी केले. तर आभार चेतन कापडणे यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, दुधसंघ संचालक रमेश पाटील, संदीप सुरळकर यांनी मनोगत व्यक्त करून ना. गुलाबराव पाटील यांनी विकासकामांचा झंझावात सुरू केला असून जळगाव ग्रामीण मध्येही शेकडो कोटींचे विकास कामे सुरु असल्याचे असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते रवी कापडणे, उपसरपंच कमलाकर पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, दूष संघ संचालक रमेश पाटील, बबन पाटील, महेंद्र जैन, लहू पाटील, विक्रम पवार, पंडील पाटील, पं.स. माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्धन कोळी , साहेबराव वराडे, भरत बोरसे, पी. के. पाटील, शिरीष पाटील, समाधान चिंचोरे, संतोष कापडणे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, अनिल पाटील , प्रदीप पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, स्वप्नील परदेशी, रामकृष्ण काटोले, राजुभैया पाटील, ठेकेदार विरेंद्र पाटील, धोंडू जगताप, अर्जुन पाटील, संदीप सुरळकर, प्रिया इंगळे, वत्सलाबाई पाटील, शिल्पा ब्रम्हणे, सुशीला पाटील , सचिन पाटील, रामलाल चव्हाण , वडली सरपंच युवराज गायकवाड , साहेबराव चव्हाण, बाळू धाडी, पुनमचंद राठोड, राजाराम, राठोड, यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.