Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून !
    क्राईम

    जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून !

    editor deskBy editor deskMarch 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यावल तालुक्यातील वृद्धाचा तर चोपडा तालुक्यात लहान भावाने मोठ्या भावाचा तर आज दि २६ रोजी जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यात झालेले खुनाचे गूढ बाहेर येत नाही तोच आज दि २६ रविवारी रोजी रात्री पुन्हा तरुणाचा खून झाला आहे. गेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर काही तरुणांमध्ये रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाद सुरू होता. रात्री १०.१५ च्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हलविला असून मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा साक्षीदार असलेल्या एकाला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.