अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर नगरपालिकेचे अधिकारी कर वसुलीसाठी गेले असता त्याठिकाणी दोघांनी नगरपालिकेच्या पथकातील अधिकारीसह कर्मचारीना शिवीगाळ करीत धक्काबुकीयासह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील नगरपालिकेचे उपमुख्याधिकारीसह कर्मचारी यांनी शहरातील काही भागात दि २४ रोजी कर वसुलीसाठी गेले असता आल्हाद नगरातील पवार परिवाराकडे मालमत्ता कर घेण्यासाठी आले याठिकाणी असलेले संशयित आरोपी देवेद्र सुभाष पवार व धीरज सुभाष पवार यांनी पथकात आलेले उपमुख्याधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करीत धक्काबुकी केल्याने दोघाविरोधात अमळनेर पोलिसात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे करीत आहेत.