जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला. या प्रकरणी गुरूवारी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (41) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आव्हाणा शिवारातील शेत गट नंबर 517 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी रब्बी हंगामात मकाचे कणीस काढून ठेवलेले होते. बुधवार, 22 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग लागली. यात मकासह चारा जळून खाक झाल्याने सव्वा लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी गुरूवारी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.