जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाला तिघांनी मारहाण करीत त्याच्याकडे असलेले एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गोलाणी मार्केट परिसरात नवी पेठेत कैजाद नवरोज जलगाववाला (वय ३६) यांचे कॉम्पुटर रिपेरिंगचे दुकान आहे ते दि २३ रोजी रात्री एमआयडीसी परिसराकडून रिक्षामध्ये बसून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानात सामान ठेवण्यासाठी आले असता गोलाणी मार्केट परिसरातील ब्रेकर्स पोईट येथे ३ अनोळखी इसमांनी कैजाद याच्या जवळ येत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या खिश्यातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तर त्याच्याकडे असलेल्या ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २ टॅब असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा समान ३ अनोळखी चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी तरुणाने जळगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.उमेश भांडारकर हे करीत आहेत.