• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव एसीबीची मोठी कारवाई : दोन पोलिसांना लाच घेतांना अटक !

editor desk by editor desk
March 24, 2023
in क्राईम, जळगाव, फैजपूर
0
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. नुकतीच चाळीसगाव तालुक्यात तलाठीसह कोतवाल लाचखोरीत अडकला असल्याची घटना ताजी असतांना फैजपूर तालुक्यातील एका पोलीस स्थानकातील आज तीन पोलीस कर्मचाऱ्यानी लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील असलेल्या बामणोद येथे पत्त्याचा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपूर पोलिस स्थानकाचे 3 कर्मचाऱ्यांनी 4 हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाचे पथकाने ताब्यात घेतले आहे. यातील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे हेंमत सांगळे,किरण चाटे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा 4,000/रु.प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आज तक्रार देवून फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून वरील दोन्ही आरोपीतांची भेट घेण्यास गेले असता त्यांना वरील हेंमत सांगळे हे भेटले त्यांनी तक्रारदार यांचेकडे कामाची व पैशाची बोलणी करून हेमंत सांगळे यांनी त्यांचे मोबाईल फोनवरून किरण चाटे यांना फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी करून किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन देवून तक्रारदार व किरण चाटे यांचे बोलणे करून दिले. किरण चाटे यांनी त्यांचे फोनवरून हेंमत सांगळे यांच्या फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम हेमंत सांगळे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार हेमंत सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व किरण चाटे यांचेसाठी 3,000/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी 1,000/-रु.अशी एकुण दरमहा 4,000/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम हेमंत सांगळे यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारून महेश वंजारी यांचेजवळ दिली असता महेश वंजारी यांना सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची माहिती असतांना त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारली. म्हणून तीन्ही आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.बच्छाव, दिनेशसिंग पाटील, ईश्वर धनगर, राकेश दुसाणे, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे,शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदिप पोळ , सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी,प्रणेश ठाकुर यांच्यासह आदींनी केली.

Previous Post

खोके घेतले असते तर गुडघे टेकले असते ; संजय राऊतांचा दावा !

Next Post

नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

Next Post
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group