मुंबई : वृत्तसंस्था
उर्फी जावेद नेहमी अशी काही फॅशन करते जी पाहिल्यानंतर तिच्या कल्पनाशक्तीवर विश्वासच बसत नाही. मात्र नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा तिच्या फॅशनचा किंवा तिच्या कपड्याबद्दल नसून तो तिच्या रिलेशनशिपबद्दल आहे.
होय उर्फी जावेद कुणाला तरी डेट करत असल्याच तिनं म्हटलंय. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यावर फुलांचा गुच्छ आहे आणि लिहिलेलं आहे की, त्यानं होय म्हटलं. ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिपचे वारे वाहु लागले. नेटिझन्सने लगेचच उर्फीला तिचा जोडीदार सापडला असल्याचा अंदाज लावला. या पोस्टवर तिने हृदयाचा एक इमोजी देखील बनवला, ज्याला पाहून लोक उर्फीला तिचा पार्टनर भेटला असं म्हणतं आहे. आता सोशल मिडियावर तिच्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र उर्फीनं त्यावर असं काही लिहिलेल नाही की ती रिलेशनशिपमध्ये आहे किंवा लग्न करणार आहे. अद्याप तरी तिनं याबद्दल काहीच स्पष्ट सांगतिलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर अनेक युजर्सने मुलगा कोण असा प्रश्न तिला विचारणं सुरु केलं आहे.
अनेकांनी तिचं अभिनंदन केलयं तर एकाने लिहिले की असा खजिना कोण सोडेल? तर दुसऱ्याने लिहिले की तो भाग्यवान मुलगा कोण आहे? तर एकानं थेट तिला लग्न कधी आहे असाच सवाल केला आहे. निदान त्याला तरी चांगले कपडे घालू दे असा सल्लाही काहींनी तिला दिला आहे. उर्फी जावेदची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उर्फीला रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्याच्या बातम्या येत होत्यात . रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 13’ आणि कंगनाच्या ‘लॉकअप 2’साठी तिला अप्रोच करण्यात आले आहे असं बोललं जात होत मात्र उर्फीनं या बातम्यावर स्पष्टपणे नकार कळवला होता. आता तिला कोणी आणि कशासाठी होकार कळवला आहे. हे तर लवकरच कळेलचं.