एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात असलेल्या अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्य करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि २५ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान एरंडोल बस स्थानक परिसरातून अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी शरद बागल हे करीत आहेत.