जळगांव : प्रतिनिधी
जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी तसेच पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून उठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर म्हटला आहे. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत विकास सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यात असून यासाठी स्वतंत्र लढ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेच्या पदरात नक्कीच मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना-भाजप युती बाबत लवकरच वरिष्ठ नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार आहे. ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून , शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा उपतालुका प्रमुख नाना सोनवणे,उपाध्यक्ष माजी सभापती कैलास चौधरी, माझी सभापती नंदू पाटील, डॉ कमलाकर पाटील,अनिल मोरे, पंकज पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील नांद्रा, मुरलीधर पाटील, शांताराम सोनवणे, बापू महाजन,दिलीप अगिवाल, दगडु चौधरी, जितू अत्रे, वसंत भालेराव, सचिन पाटिल चंद्रशेखर पाटील रमेश जळकेकर पि.के पाटील अर्जुन पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव तालुक्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी केली जात आहे या निमित्ताने जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.