जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या हिस्स्यांची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणारा बोरखेडा येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास रंगेहात जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५०) रा.बोरखडो ता.चाळीसगाव याने ७ हजाराची मागणी केली. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने सापळा रचला. तलाठी ज्ञानेश्वर कोळी यांनी कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७ रा.श्रीकृष्ण नगर,चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव यांच्या मार्फत गुरूवार २३ मार्च रोजी ५ हजाराची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोना ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोनाजनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ , पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉप्रणेश ठाकुर यांनी केली.