धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून 4 रोजी सोमवार सकाळी ११:३० वाजता मोठया उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसी ३२४ विद्यार्थी (३५%) विद्यार्थी यांनी उपस्थितीदिली. विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव तसेच गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक रविंद्र धनगर सपत्निक हजर होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूणजी कुळकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापूरे सर, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, संस्थेचे आदर्श संचालक अजयजी पगारीया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार यांनी शुभेच्छा दिल्या.
संचालक अजयशेठ पगारीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, शिस्त, कोरोनाविषयी नियमांचे पालन, या काळात घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एम. पाटील, प्रा. डॉ. ए. डी. वळवी, प्रा. डॉ. कांचन महाजन, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर. आर. पाटील, पर्यवेक्षक प्रा. बी. एल. खोंडे, जेष्ठ शिक्षक प्रा. ए. आर. पाटील, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. श्रीमती आर. पी. चौधरी, प्रा. व्ही. आर. पाटील, प्रा. आर. जे. पाटील मॅम, प्रा. एस. आर. अत्तरदे, प्रा. एम. एस. कांडेलकर, प्रा. आर. सी. पवार, प्रा. डॉ. पी. बी. सोनवणे, प्रा. के. डी. महाजन मॅम, प्रा. एन. एम. पवार मॅम, प्रा. एन. डी. सोनवणे, प्रा. यु. व्ही. पाटील, प्रा. पी. सी. साळवे, प्रा. अमित बागुल कार्यालय अधिक्षक प्रा. डी. जी. चव्हाण, ग्रंथपाल प्रा. पंकज देशमुख, अविनाश पारेख, राजेंद्र अहिरराव, कैलास पाटील, परेश पाटील, अनंता पिहूल, राजेंद्र चौधरी, यशवंत कापडे, रितेश सांळुखे, गजानन माळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू चव्हाण, सुनिल पाटील, सुजित जैन, जितेंद्र परदेशी, संजय तोडे, मनोहर महाले, किरण सुतारे, सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू – भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



