मुंबई : वृत्तसंस्था
गुजरातमधील एका तरुणाने बालकल्याण समितीकडे धाव घेत एका महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपण 16 वर्षांचे असताना या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.
आपल्यात आणि या महिलेमध्ये 5 वर्षांचे अंतर आहे. 16 वर्षांचा असताना ही तरुणी 21 वर्षांची होती. ही तरुणी आपल्याला हॉटेलमध्ये न्यायची आणि बलात्कार करायची असं या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. तू सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू असं आश्वासन या तरुणीने दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत या तरुणीने आपल्याकडून पैसेही उकळल्याचं या तरूणाचं म्हणणं आहे. ही तरुणी अन्य एका व्यक्तीशी लग्न करून मोकळी झाल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.
तक्रारदार तरूण आता 22 वर्षांचा झाला असून त्याने या तरुणीवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तरुणाच्या तक्रारीनंतर बालकल्याण समितीने पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. तक्रारदार तरुणाचे म्हणणे आहे की त्याची आणि या तरुणीची ओळख 2015 साली एका कार्यक्रमात झाली होती. गुजरातमधल्या एका गावातील कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे भेटले होते. यावेळी महिलेने तक्रारदार तरुणाचा मोबाईल नंबर घेतला होता. कालांतराने या तरुणीने तक्रारदाराला फोन करून लग्नाची मागणी घातली. यावेळी तक्रारदाराने आपण अल्पवयीन असल्याचे सांगितले. यावर या तरुणीने मी तू सज्ञान होईपर्यंत वाट पाहीन असं आश्वासन दिलं हतं. यानंतर या तरुणीने अनेकदा हॉटेलमध्ये खोली बुक करून या तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकंच नाही तर तिने आपल्याकडे पैशांचीही मागणी केली असं या तरुणाचं म्हणणं आहे. नर्सिंग कोर्ससाठी तिने आपल्याकडून पैसे मागितले आणि नंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी 5 लाख रुपये आपल्याकडून घेतल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. तक्रारदार तरुणाचं म्हणणं आहे की 6 महिन्यांपूर्वी या तरुणीने अन्य व्यक्तीशी लग्न केलं आहे.