धरणगाव : प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्यासाठी आले असता मंत्री सत्तार यांच्या ताफ्यावर खोके, कापूस फेकल्याप्रकरणी आता ठाकरे गट अडचणीत आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात १३ पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पारोळा नाक्याच्या पुढे यश प्रोव्हिजन समोर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी करीत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहे. पण यावेळी मंत्री सत्तार यांच्या गाडी वर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खोके फेकल्याने वाद चिघळला होता. जे त्यांनी आंदोलन केले. त्या बाबत कुठलेही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी काढलेली नव्हती तर थेट गाडी वर खोके फेकणे आता ठाकरे गटाला भोवले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ , निलेश चौधरी यांच्यासह तब्बल १२ कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.