धरणगाव : प्रतिनिधी
राज्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देखील दिले असून जळगाव जिल्ह्यात देखील शेतकरीचे नुकसानासह जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील पीपळे शिवारात १०० च्या जवळ पास मेंढीचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे मेंढपाळावर मोठा संकट कोसळले असतांना आज दि २२ रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत धरणगाव तहसीलदार यांना बोलवून पंचनामा करून त्यांना मोबदला भेटायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
या वेळी उपस्थित माजी सभापती प्रमोद बापू पाटील, सरपंच जगदीश पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, रवी माळी, बाळू जाधव , मच्छिद्र कोळी, सुभाष ननव्हरे, प्रमोद भाऊ व. जगदीश देसले यांच्यासह आदी उपस्थित होते.