अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील एका गावात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने अमळगाव परीक्षा केद्रातून पळवून नेल्याची घटना घडल्याने मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २० मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळगाव परीक्षा केद्रातून अल्पवयीन मुलगी परीक्षा देवून बाहेर आल्यानंतर ती घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सा.फौ.राजेद्र पाटील हे करीत आहेत.