• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाळू वाहतुकीचा वाद भोवला ; तरुणाची हत्या !

कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 20, 2023
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
वाळू वाहतुकीचा वाद भोवला ; तरुणाची हत्या !

एरंडोल : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून अनेक हाणामारीसह खुनाच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाही. अशीच घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत एकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना रविवारी सकाळी एरंडोल तालुक्यातील भातखंडे उत्राण दरम्यान घडली आहे. यामध्ये सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. त्यावेळी वाहनातून आलेल्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अर्धा तास पडून असलेल्या सचिनला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या चुलत भावाने पाचोरा येथील रुग्णालयात आणले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह जळगावला जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

याप्रकरणी कासोदा ता. एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सचिन हा वाळूमाफिया असल्याने पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा अशी प्राथमिक शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा गिरड (ता. भडगाव) येथील युवकांशी वाद झाला होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

Previous Post

शहरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात दाखल !

Next Post

लिंक आल्यावर टाकले २ रुपये नंतर ९८ हजार गायब

Next Post
धरणगावात एकाची फसवणूक ; गुन्हा दाखल

लिंक आल्यावर टाकले २ रुपये नंतर ९८ हजार गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group