जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्याची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच १९ मार्च रोजी जळगाव शहरातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी ना.गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात दाखल झाले आहे.
ठाकरे गटाचे जळगांव शहरातील माजी उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, निष्ठावंत कार्यकर्तेसह दि.१९ रोजी अजिंठा विश्रामगृहात संध्याकाळी ६ वाजता राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थित शिववसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी उपमहानगप्रमुख सोहम विसपुते, राहुल नेतलेकर विलास भदाणे, फेरीवाला महानगरप्रमुख बाळू बाविस्कर, विभागप्रमुख नितीन तामयचे, बॉबी चांगरे, वकील आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड राजेश पावसे ,रवींद्र सोनवणे, अजय धोबी, रुपेश चौधरी,रवी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा प्रवेशवेळी जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिताताई माळी, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक शाम कोगटा शोभा चौधरी, नगरसेवक चेतन संकत, दिलीप पोकळे, गजानन देशमुख, किशोर भोसले, आशुतोष पाटील, शिवराज पाटील आदींची उपस्थिती होती