जळगाव : प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. त्याबाबतचे अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या असतांना जळगाव तालुका पोलिसांनी एका अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आव्हाणे येथील गिरणा नदीपात्राजवळून एक ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई १८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, हरिलाल पाटील, अनिल मोरे, संदीप पाटील व रामकृष्ण इंगळे हे आव्हाणे गावातील नदी किनाऱ्याजवळ पोहचले. त्या ठिकाणी विनाक्रमांकाचे एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व ट्राली येताना दिसले. ट्रॅक्टर चालकाने त्याचे नाव रहीमखान रऊपखान पठाण (२४, रा. आव्हाणे) असे सांगितले. ट्रॉलीमध्ये चार हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू आढळून आली. त्यासह तीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्राली जप्त करण्यात आली. पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.