मुंबई : वृत्तसंस्था
देशात नियमित अशा घटना घडत असतात कि त्या आपल्याला समजल्यावर धक्काच बसत असतो यात प्रामुख्याने महिलावर होणारे अत्याचाराचे मोठे प्रमाण असतांना आता एक नवीन घटना समोर आली आहे. चक्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणीला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. त्यात एका मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी घोषित करत तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. “पॉस्को’ कायद्यांतर्गत पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे.
इंदूरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीवर एका 16 वर्षीय मुलाला फूस लावून गुजरातला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. ही मुलगी राजस्थानची होती. तिथे या मुलीने मुलाला टाइल्सच्या कारखान्यात कामावर लावले. तसेच मुलाला स्वतःशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. तिने प्रदिर्घ काळापर्यंत या अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषणही केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बाणगंगा भागात राहणाऱ्या एका महिलेने 2018 साली पोलिसांत आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता मुलाचे लोकेशन गुजरातमध्ये आढळले. पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. तिथे त्याच्यासोबत 19 वर्षीय मुलगीही राहत असल्याचे त्यांना आढळले. मुलीने भाड्याने घर घेतले होते. त्यात ती मुलासोबत एकत्र राहत होती. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्यांने संपूर्ण घटनाक्रम विषद केला. “मुलीने मला नोकरीचे आमिष दाखवून गुजरातला आणले. तिथे माझा फोन हिसकावून घेतला. ती मुला कुणाशी बोलूही देत नव्हती. माझ्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत होती,’ असेही त्याने म्हटले.
“पॉस्को’ कायद्यांतर्गत 10 वर्षांची शिक्षा
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणीला अटक करून तिच्याविरोआधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर झालेल्या तपासात मुलाने केलेले सर्वच आरोप खरे सिद्ध झाले. मुलाचे प्रदिर्घ काळापर्यंत लैंगिक शोषण झाले होते. एखाद्या मुलीवर बलात्काराचा आरोप झाल्याचे हे बहुदा देशातील पहिलेच प्रकरण आहे. पॉस्को कायद्यांतर्गत न्यायालयाने आरोपी तरुणीला 10 वर्षांची शिक्षा व 3 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षाही ठोठावली.