धरणगाव : प्रतिनिधी
एका कुरियर कंपनीने शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीकडे फोन करून लिंकद्वारे पाच रुपये भरण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यातील तब्बल ८३ हजार रुपये लंपास झाल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील नितीन श्रावण पाटील (वय ४५) यांची एका कुरियर कंपनीने कस्टमर केअरच्या नंबरवरून फोन करून फिर्यादीकडे कुरियरचे डीटेल्स विचारून मोबाईलवर एक पीडीएफ पाठवून त्यासोबत एक लिंकद्वारे ५ रुपये पाठविले. नंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या खात्यातील ५ वेळा अनोळखी इसमाने ८३ हजार रुपये काढल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे हे करीत आहेत.