मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, खडसे
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता ईडीचा विषय संपला आहे मी फक्त कोर्टाला घाबरतो असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप च्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
तुम्ही छळतात म्हणून मी पर्याय निवडला माझ्याकडे अनेक पर्याय होते परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश घेतला आणि माझा पक्ष माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे
गिरीश भाऊ म्हणतात ना करा चौकशी घाबरू नका चौकशी सुरू आहे असेही खडसे म्हणाले कार्यकर्त्यांनी सीडी बद्दल विचारले असता पोलीस चौकशी करत आहेत त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या माझ्या कडे अली होती सीडी थोडक्यात हुकली नाहीतरी तुम्हाला माहीत आहे ना कोणाची आहे सीडी मग झाले ना.काही चिंता नाही भक्कम रहा एकत्र राह काही चिंता करू नका आता ईडी चा ना आपला संबंध संपला आता आपल्याला घाबरायचे कारण नाही न्यायालयात दाखल झाली आणि त्याचा संबंध संपला ईडीची नोटीस आली म्हणून गायब होतो म्हणे मी दोन दिवसांपासून फरदापुर च्या विश्रामगृह येथे होतो ते म्हणाले.
मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही १० कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.यानंतर एकनाथराव खडसे यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना पुन्हा एकदा महाजनांसह भाजप आणि भाजप नेत्यांना लक्ष केले आहे.
या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी ईडीबाबतची भाष्य केले. ते म्हणाले की, मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं ते म्हणाले. यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे.